which is the best way to learn stock market

        स्टॉक मार्केट शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग (Best way to learn Stock Market) हें पुस्तकं (Books), ब्लॉग(Blog), यूट्यूब व्हिडीओ (YouTube Video), मार्गदर्शन करणारे अनुभवी ट्रेडर्स (Mentorship), आणि सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या अनुभवातून शिकणे (Self Learning).

Stock Market मध्ये Trading करण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते पाहिले म्हणजे ज्ञान आणि दुसरे म्हणजे स्वतःचा अनुभव (experience). ज्ञान हें पुस्तकं किंवा YouTube video द्वारे घेऊ शकतो पण अनुभव स्वतःला घ्यावा लागतो. एखाद्या Beginner ला Stock Market ची Basic माहिती घेण्यासाठी पुस्तकाद्वारे सुरुवात करू शकतो. उदा. Candlestick Patterns, Price Action, Technical Analysis यां सर्व गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहेत. Trading ची शब्दावली आणि संकल्पना हें पुस्तकं आणि YouTube यांच्याद्वारे शिकू शकतो.

The goal of Successful trader is to make the best trades. Money is Secondary.

Alexander Elder

Can I learn Trading From Books ?

        हो, तुम्ही Trading पुस्तकां-द्वारे कमी खर्चात शिकू शकतो. पुस्तकं तुमची Trading journeyसोपी करण्यासाठी मदत होते. मुलभुत ज्ञान हें पुस्तकांतून मिळू शकते. उदा. Candlestick Pattern, Technical Analysis यांसारख्या इतर सर्व माहिती Trading Books मधून मिळू शकते.

Technical Analysis of Financial Markets – John J. Murphy यांच पुस्तक आहे यामध्ये सर्व टेक्निकल Analysis ची माहिती दिली आहे तरी Beginner साठी हें पुस्तक उपयोगी आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व Best Trading Books वाचली तरी तुम्हाला लगेच Trading करता येईल आणि दुसऱ्या दिवसापासून Profit कमवायला लागणार असे होणे शक्य नाही आणि ज्यांचा स्टॉक मार्केट मध्ये अनुभव असेल त्यांच्यासाठी पुस्तकं त्यांचा Trading Performance वाढवण्यासाठी उपयोगी होईल.

Best Trading Books वाचणार तेव्हा क्रम लावून वाचले पाहिजे म्हणजे कीं पाहिले Price Action, Technical Analysis आणि Trading Psychology याक्रमानुसार वाचले पाहिजे.Trading Mindset तयार करण्यासाठी पुस्तकांचे मदत होते. पुस्तकं तुम्हाला trading मध्ये काय केले पाहिजे आणि काय करू नये हें तुम्हाला कळते. समजा एखाद्या डॉक्टरला त्याची पदवी प्राप्त करण्यासाठी ४ वर्ष लागतात आणि त्यासोबत अनुभव यां सर्व गोष्टी झाल्यानंतर पदवी मिळते, तर् त्या ४ वर्षात जी माहिती घेतली त्याची तो आधी अंमलबजावणी करतो तेव्हा तो एकं यशस्वी डॉक्टर होतो.

Trading मध्ये Trader ला पुस्तकांतून मूलभूत माहिती घेऊन त्याच्यातून Trading Mindset तयार करून आणि त्याच्यावर implement कराल तेव्हा ज्या चुका होतील त्याला वेळेवर सुधारुन तेव्हा तुम्ही एकं यशस्वी Trader च्या वाटे जवळ पोहोचणार.Trading ची दिशा दाखवण्याची काम पुस्तकं करते ज्यांना Couse करण्यासाठी पैसे नाही त्यांच्यासाठी पुस्तकां-द्वारे शिकण्यास मदत होईल.

Is it possible to learn Trading From YouTube?

       हो, तुम्ही मोफत Trading यूट्यूबद्वारे शिकू शकता. जर तुम्ही Beginner आहात तर् तुम्ही Rayner Teo, Elearnmarkets, Abhishek Kar, Power of Stocks, Ghanshyam Tech यां विविध प्रकारच्या YouTube Channel द्वारे तुम्ही ट्रेडिंग संबंधाची माहिती मिळेल.

पण त्याचबरोबर याचा दुरुपयोग आहे तें म्हणजे एकं Proper Direction नाही भेटते कारण माहिती ही यूट्यूब वरती खूप जास्त असल्यामुळे त्याच्यातील नक्की कोणती माहिती घ्यावी हां प्रश्न पडतो आणि त्यातील कोणती माहिती स्वतःच्या उपयोगाची आहे हें पण महत्वाचे आहे. Trading ची माहिती यूट्यूबवरती जास्त असल्यामुळे शिकण्याची दिशा भरकटु शकते तर् त्यासाठी जों अनुभवी Trader असेल त्यांच्याकडून शिकावे आणि त्यांच्या अनुभवातून trading शिकण्याचा एकं आराखडा तयार करून त्या मार्गाने जावे.

YouTube वरती असे ही यूट्यूबर् आहेत जें trading करत नाहीत पण ट्रेडिंग शिकवतात अशा युट्यूबर पासून दूर राहावे. YouTube Podcast द्वारे आपण ट्रेडिंग बद्दलची माहिती मिळवू शकता कारण दुसऱ्या व्यक्तींचा अनुभव हां तुम्हाला ट्रेडिंग चा प्रवास सोपा करतो. ट्रेडिंग शिकताना जेव्हा यूट्यूब चा वापर करतो तेव्हा बऱ्याच अनुभवी Trader च्या व्हिडीओ बघत असतो.यामुळे जों Beginner Trader असतो तोच भरकटत जातो त्यामुळे एकाच Trader चां channel वरची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आणि हळूहळू एकं एकं माहिती शिकणे. जेव्हा तुम्ही एकत्र सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास (Confidence) कमी होतो आणि जर तुम्हाला खरंच Trading शिकण्यासाठी इच्छुक असाल तेव्हा तुम्ही Step by step शिकत जावे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढलेला जाणवेल.

What is the best blog for beginners to learn Stock Market Trading ?

        सर्वात चांगली ब्लॉग वेबसाईट ही "Trading with Rayner" ही आहे आणि त्यासोबत Investopedia, Elearnmarkets यां website आहेत. यां वेबसाईटद्वारे मोफत माहिती आणि त्याचबरोबर Trading शिकण्याचा व्यवस्थित आराखडा मिळतो यातून तुमचा शिकण्याचा वेळ कमी होतो.

ब्लॉग आणि Website द्वारे संकल्पना व्यवस्थिरित्या समजते. उदा. Support म्हणजे काय? Emotion म्हणजे काय? आणि त्यावरती कसा control केला पाहिजे यां सर्व गोष्टी समजण्यासाठी ब्लॉग website चां उपयोग होतो.

Which Course is Best For Trader ?

        India मध्ये खूप सारे Best Trading Courses आहेत पण त्यांच्यातला कोणता निवडावा हां प्रश्न पडतो यासाठी तुम्ही सध्या कोणत्या स्तरावर आहात हें कळणं गरजेचे आहे. Trading मध्ये नवीन आहात तर त्यासाठी त्यापद्धीचा Course निवडावा लागेल. Trading course निवडताना तुम्हाला आधी पुढची व्यक्ती  जें शिकवत आहे त्या सर्व माहिती समजत आहे कां यावर अवलंबून राहणार.

Trading करण्याच्या दोन प्रकारच्या पद्धत आहे पहिली पद्धत Intraday Trading आणि दुसरी पद्धत Positional Trading किंवा Swing Trading त्यामधल्या कोणत्या प्रकारची Trading करण्यास तुम्ही इच्छुक आहात याच्यावर अवलंबून राहते. Intraday Trading मध्ये दोन वेगवेगळे segment आहेत त्यामध्ये equity आणि Future & Option (F&O) हें आहेत, यामध्ये कोणत्या प्रकारचे trading करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात याच्यावर आधारित होईल तसेच यां सर्व गोष्टी Positional किंवा Swing Trading साठी पण लागू होतील.

Stock Market Courses करण्यासाठी आधी तुम्हाला तुमची गरज काय आहे तीं ओळखावी लागेल त्यानंतर तुम्ही त्याच्या संबंधी माहिती शोधावी लागेल आणि जें Courses शोधणार त्या Trader ची माहिती घ्यावी आणि त्याचा अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा असावा, तसेच नियमित पणे तें नफ्यामध्ये असले पाहिजे जेव्हा यां अटी पूर्ण होतील त्यानंतर त्यांचे Free Seminar पहावे तें समजत असेल तर् त्या trader चां course निवडावा. जेव्हा तुम्ही Course घेतला त्यासोबत तुम्हाला मोफत आयुष्यभर मार्गदर्शन मिळेल व इतर Stock Market Learning चे वैशिष्टे मिळतील.

Trading Course निवडताना ट्रेडिंग क्षेत्रात नवीन आहात तर् त्याच्यानुसार मार्गदर्शन (Mentorship) घ्यावे लागेल आणि अनुभवी ट्रेडर् असाल तर् त्यानुसार मार्गदर्शन घ्यावे लागेल यासाठी तुम्हाला स्वतःची चाचणी करावी लागेल. उदा. Beginner Trader, Intermediate Trader and Experience Trader. ट्रेडिंग मध्ये नवीन आहात तर् Trading Mindset कसा तयार केला पाहिजे यां दृष्टिकोनातून कोर्स पहावे. तुमच्या Mindset जेव्हा तयार होईल तेव्हा बऱ्यापैकी छोट्या चुका टाळता येईल आणि तुम्ही Trading च्या प्रवासामध्ये एकं पाऊल पुढे असाल.

Best Stock Market Courses ज्यांना करता येणार नाही त्यांनी निराश होऊ नये तर् तुम्ही जें इतर मार्ग सांगितले त्याचा विचार करावा आणि सध्या internet free काळ असल्यामुळे तुम्हाला सर्व माहिती मोफत मिळाली जाते. यां मिळालेल्या माहितीची अंमलबजावणी करून एकं यशस्वी वाटचाली जवळ पोहोचण्यास मदत होईल.

Is it Possible to Self learn Trading ?

        हो, तुम्ही स्वतः Trading शिकणे हां सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण अनुभवातून शिकल्यावरती आत्मविश्वास बळकट होतो आणि आत्मविश्वास बळकट असणे हें Trading मध्ये खूप गरजेचे आहे.

Trading जेव्हा स्वतः शिकतो तेव्हा खूप काही चुका होतात. त्या चुकातून तूम्ही शिकत राहता. ट्रेडिंग मध्ये खूप काही गोष्टी Distract करत असतात. आपण प्रत्येक वेळेस १००% Successful Trading Strategy शोधण्याच्या मागे लागलेले असतो . अशी कोणतीच Strategy १००% यशस्वी नाही. यां गोष्टींमुळे जों शिकण्याचा कालावधी वाढतो. जों काही अनुभव ट्रेडिंग मधून मिळतो तो आपल्या Trading Psychology ची वाढ होण्यास मदत होते. जरी तुम्ही course केला किंवा YouTube videos पाहिले, पुस्तकं वाचली तरी तुम्हाला अनुभव घ्यावाच लागेल त्यामुळे अनुभवाशिवाय Trading शिकणे कठीण आहे.

Stock Market मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जरी पुस्तकं वाचली Courses केले तरी ट्रेडिंग मध्ये लवकर Profit मिळण्यास सुरुवात होईल याची अपेक्षा करू नये कारण बऱ्याच गोष्टींचा अनुभव घ्यावा लागेल त्यानंतर तुम्ही Profit कमवू शकता. त्यासोबत तुम्हाला संयम ठेवून स्वतःच्या Strategy वर विश्वास ठेवून Trade करत राहणे गरजेचे आहे.

ट्रेडिंग एका दिवसात शिकता येत नाही तर् त्याला कमीत कमी ३ तें ४ वर्ष द्यावी लागेल तें पण कोणतीही अपेक्षा न ठेवता. जर डॉक्टर, वकील आणि अभियंता होण्यासाठी ३ तें ४ वर्षाचा वेळ लागत असेल तर तुम्हाला दोन तें तीन महिन्यात Trading संबंधांचे ज्ञान घेऊन पैसा कमवायला लागला हें होणे अशक्य आहे.तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि अनुभव वाढवावे लागेल त्यानंतर तुम्हाला profit मिळण्यास सुरुवात होईल.

If you can learn to create a state of mind that is not affected by the Market’s Behaviour. The
struggle will cease to Exist.

Mark Douglas

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top
%d bloggers like this: